प्रभाग ८: इंद्रायणीनगरचा ‘ग्लोबल’ लूक, पण लोकल समस्यांचे काय? विकासाचा बॅकलॉग कधी भरणार?

पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग ८ म्हणजे विविध संस्कृतींचा संगम असलेला भाग. येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले नोकरदार आणि व्यावसायिक राहतात. चकाचक रस्ते आणि उद्याने एका बाजूला असली, तरी दुसरीकडे ‘आरोग्य’ आणि ‘शिक्षण’ यांसारख्या मूलभूत गरजांसाठी येथील नागरिकांना आजही वणवण करावी लागत आहे.

१. पॉलिटिकल वझीरच्या मते:-

एकूण मतदार: ५०,३२३.

मतदार विभागणी: पुरुष (२७,०९२) आणि महिला (२३,२३०).

मिश्र वस्ती: सुशिक्षित नोकरदार वर्ग आणि स्थानिक व्यावसायिक यांचा मोठा प्रभाव असल्याने येथील निवडणूक नेहमीच अटीतटीची होते.

आरक्षण: ८-अ (SCअनुसूचित जाती), ८-ब (OBC महिला), ८-क (महिला राखीव) आणि ८-ड (सर्वसाधारण खुला).

२. बॅटल ग्राऊंड मधील प्रमुख भाग:-

या प्रभागात प्रामुख्याने इंद्रायणीनगर सेक्टर क्र. १, २, ४, ५, ६, ९, ११ आणि १२ तसेच महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डाच्या वसाहतींचा समावेश होतो.

३. ग्राऊंड रिपोर्ट: प्रश्नांचा पंचनामा:-

नागरिकांशी संवाद साधल्यावर काही गंभीर प्रश्न समोर आले आहेत:

आरोग्य सेवेचा अभाव: प्रभागाची लोकसंख्या मोठी असूनही येथे महापालिकेचे एकही मोठे हॉस्पिटल नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.

भाजीमंडईचा गोंधळ: सेक्टर २ मधील भाजीमंडईत ओटे असूनही विक्रेते रस्त्यावर बसतात, ज्यामुळे रहिवाशांना चालणे कठीण झाले आहे.

सुरक्षेचा प्रश्न: भोसरी पोलीस स्टेशनच्या इमारतीचे काम आणि नवीन पोलीस चौकीची गरज अद्याप पूर्ण झालेली नाही.

शिक्षणाकडे दुर्लक्ष: सेक्टर १ मधील मुख्य माध्यमिक शाळा आणि जलतरण तलाव काम वर्षानुवर्षे रखडलेले आहे.

४. विकासाची ‘एक बाजू’ आणि प्रलंबित कामे:-

मार्गी लागलेली कामे:-

  • स्वामी विवेकानंद उद्यान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान विकसित झाले.
  • आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्केटिंग ट्रॅक तयार झाला
  • ओपन जिम आणि काही रस्त्यांचे पेव्हिंग ब्लॉकचे काम पूर्ण.

रखडलेली कामे:-

  • सेक्टर २ मधील पोस्ट ऑफिसचे काम अद्याप पूर्ण नाही.
  • सेक्टर ६, ९, ११ मध्ये अद्याप वीजपुरवठा भूमिगत झालेला नाही.
  • ‘पीएमआरडीए’ आणि ‘मनपा’ च्या जागेच्या वादात अनेक विकासकामे अडकली आहेत.

५. विश्लेषण: प्रभाग ८ (इंद्रायणीनगर)

(बळ):- सुशिक्षित नागरिक आणि सांस्कृतिक विविधता.

(उणीवा):- महापालिकेच्या स्वत:च्या मालकीच्या आरोग्य सुविधांची वानवा.

(संधी):- रखडलेल्या शाळा आणि मंडईचे प्रश्न सोडवल्यास मतदारांचा मोठा पाठिंबा मिळू शकतो.

(धोका):- गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि अपुऱ्या सोयीसुविधांमुळे तरुणांमध्ये असलेली अस्वस्थता.

पॉलिटिकल वझीरच्या सूचना:-

इंद्रायणीनगरचा मतदार ‘ब्रँडेड’ विकासकामांपेक्षा ‘मूलभूत सोयी’ देणाऱ्या नेत्याला महत्त्व देतो. जो उमेदवार हॉस्पिटल आणि रखडलेल्या शाळा सुरू करण्याची हमी देईल, तोच या सांस्कृतिक नगरीचा खरा ‘लोकप्रतिनिधी’ ठरेल.