नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग ३५ हा सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने येथे ‘क्लीन स्वीप’ केला होता, मात्र यंदा या बालेकिल्ल्यात विरोधकांनी तगडे आव्हान उभे केले आहे. ६०,८७१ मतदार असलेल्या या प्रभागात सत्तेचे समीकरण कोणाकडे झुकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
१. पोल्टीकल वझीर च्या मते : सत्तेचे गणित आणि जातीय समीकरणे
अनुसूचित जातींचा प्रभाव: या प्रभागात १६,४८७ मतदार अनुसूचित जातीचे असून, त्यांच्या मतांचे ध्रुवीकरण ज्याच्या बाजूने होईल, तोच या निवडणुकीचा खरा ‘किंग’ ठरेल.
फ्लॅट संस्कृती विरुद्ध झोपडपट्टी: मनीष नगर आणि चिंचभवन भागातील नव्याने विकसित झालेली फ्लॅट संस्कृती आणि जुन्या झोपडपट्ट्या यांच्यातील प्रश्नांमध्ये उमेदवारांची कसोटी लागणार आहे.
बसपाचा ‘फॅक्टर’: २०१७ मध्ये बसपाच्या उमेदवारांनी १७ ते २७ टक्के मते घेतली होती, जी भाजप आणि काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे.
२. ‘बॅटल ग्राऊंड’ मधील प्रमुख वस्त्या
अजनी रेल्वे कॉलनी, सुंदरबन ले- आऊट, रानवाडी, श्रीनगर, सुयोगनगर, विजयानंद सोसायटी, पीएमजी सोसायटी, अरविंद नगर, रामकृष्ण सोसायटी, बोरकुटे ले- आऊट, संताजी सोसायटी, जय दुर्गा ले आऊट, श्री कॉम्प्लेक्स, शामनगर, शिल्पा सोसायटी, पंचधारा सोसायटी, मनीषनगर, चिंचभुवन, काचोरे पाटीलनगर, भीम नगर, रेणुका विहार कॉलनी, पंच्याशी प्लॉट, जोगी नगर
३. निवडणुकीच्या रिंगणातील ‘तगडे दावेदार’ :-
तिकिटासाठी पक्षांतर्गत मोठी चुरस सुरू असून, खालील नावांची चर्चा सर्वाधिक आहे:
भाजप: अविनाश ठाकरे, विशाखा मोहोड, संदीप गवई, किर्ती डोंगरे, अंजली देशपांडे, करुणा जयस्वाल, आसावरी कोठीवान, संदीप बुटले आणि रमेश भंडारी, रितेश गावंडे,रमेश शिंगारे, भूषण केसकर.
काँग्रेस : पंकज थोरात, नंदा देशमुख, कल्पना मानकर, कुमार बोरकुटे, मुकेश शर्मा, अनुजा शर्मा, प्रणित मोहोड, प्रकाश चवरे, समीर यादव, सदन यादव, सुनिता जिचकार, गौतम गाणार, सतिश यादव, नंदा झोडापे.
राष्ट्रवादी (शरद पवार गट): शैलेंद्र तिवारी, पिंकी शर्मा, सहदेव तितरमारे आणि आतिश गायकवाड.
४. जनतेचा जाहीरनामा: विकासाच्या नावाखाली ‘हे’ आहेत खरे प्रश्न!
प्रभागात इमारतींचे जाळे वाढले असले तरी मूलभूत सुविधांची स्थिती बिकट आहे:
अवैध धंद्यांचा विळखा: झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्रीचे अड्डे असून, गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वाहतुकीचा खोळंबा: मनीष नगर रेल्वे क्रॉसिंग आणि मुख्य मार्गांवर होणाऱ्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी दररोजची डोकेदुखी ठरली आहे.
अवैध धंद्यांचा विळखा: झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्रीचे अड्डे असून, गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वाहतुकीचा खोळंबा: मनीष नगर रेल्वे क्रॉसिंग आणि मुख्य मार्गांवर होणाऱ्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी दररोजची डोकेदुखी ठरली आहे.
ड्रेनेज आणि आरोग्य: पावसाळ्यात ड्रेनेज लाईन तुंबण्याच्या समस्या कायम आहेत, तसेच अनेक भागांत सांडपाण्याचा प्रश्न गंभीर आहे.
रस्त्यांची दुरवस्था: अजनी रेल्वे कॉलनी आणि अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.
५. प्रभाग ३५ विश्लेषण:
बळ:-भाजपचे प्रस्थापित नगरसेवक आणि मजबूत संघटन.
उणीवा:- वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात आलेले अपयश आणि अंतर्गत गटबाजी.
संधी:-काँग्रेससाठी नवीन चेहऱ्यांच्या माध्यमातून मध्यमवर्गीय मतदारांना साद घालण्याची संधी.
धोके:-बसपाकडून होणारे मतांचे विभाजन आणि बंडखोरीचा संभाव्य फटका.
राजकीय वझीरचा ‘मास्टरस्ट्रोक’:-
प्रभाग ३५ मध्ये यावेळी केवळ ‘सिमेंट रोड’ किंवा ‘फ्लाईओव्हर’ दाखवून मते मिळणार नाहीत. जो उमेदवार ‘सुरक्षित मनीष नगर’ आणि ‘अवैध धंद्यांपासून मुक्ती’ याचे ठोस आश्वासन देईल, त्यालाच या प्रभागाची जनता आपली ‘सत्तेची चावी’ सुपूर्द करेल.



