नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग ३२ हा सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. २०१७ मध्ये भाजपने येथे एकतर्फी यश मिळवले होते, मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले राजू नागुलवार आणि काँग्रेसमधील नवे चेहरे यांच्यामुळे येथील समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
१. ‘राजकीय वझीर’चा चष्मा: दावेदार वाढले, पक्षाची डोकेदुखी वाढली
भाजपचा पेच: राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आलेले राजू नागुलवार आता कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, यामुळे भाजपच्या जुन्या निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
काँग्रेसची रणनीती: काँग्रेसने यावेळी जुन्या चुका सुधारण्याचे ठरवले असून, पक्षाचे सचिव आणि माजी नगरसेविका नयना झाडे यांना मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. विलास करांगळे देखील काँग्रेसकडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
२०१७ चे चित्र:
गेल्या निवडणुकीत भाजपने येथे चारही जागा जिंकल्या होत्या (अभय गोटेकर, कल्पना कुंभलकर, रुपाली ठाकूर आणि दीपक चौधरी)
२. निवडणुकीच्या आखाड्यातील ‘इच्छुक वझीर’:-
या प्रभागातून रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची मोठी फौज तयार आहे:
भाजप: माजी नगरसेवक दीपक चौधरी, अभय गोटेकर, रूपाली ठाकूर व कल्पना कुंभलकर यांच्यासह राजू नागुलवार, बंडू सिरसाट, वैशाली काळे, वैशाली मेनकुदळे, कुणाल पडोळे, विलास बांगरे
काँग्रेस: विलास करांगळे, नयना झाडे, नितीन देशमुख, संध्या ठाकरे, सरिता लक्षणे, विमल वाघमारे, सरिता राणेकर, निमीषा शिर्के, मंगेश शातलवार, विश्वेश्वर अहिरकर, राजू बेलखेडे, भाऊराव कोकणे, रेखा थूल, पूजा देशमुख, अक्षय हेटे, धनश्री बावने.
राष्ट्रवादी (शरद पवार गट): अशोक काटले, जया काटले, मीना कुंटे आणि विलास ठाकरे.
३. ग्राऊंड रिअॅलिटी: विकासाच्या नावाखाली समस्यांचे डोंगर
प्रभागातील नागरिक अनेक मूलभूत प्रश्नांनी त्रस्त आहेत:
सिमेंट रोडचा फटका: सिमेंट रोड बनवताना रस्त्याची उंची वाढल्यामुळे पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी शिरते. अयोध्या नगर आणि जुन्या सुभेदार परिसरात ही समस्या गंभीर आहे.
गडर लाईनचा पेच: जुन्या गडर लाईनमुळे सांडपाणी वारंवार तुंबते, ज्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
उद्यानांची दुरवस्था: प्रभागात उद्यानांचा अभाव आहे आणि जे काही बगीचे आहेत, त्यांची देखभाल होत नसल्याने तिथे गवत आणि कचरा वाढला आहे.
पाणी समस्या: २४ तास पाणी योजनेची घोषणा होऊनही रहिवाशांना आजही दिवसातून केवळ १ तास पाणी मिळते.
४. प्रभाग ३२ विश्लेषण
बळ:- भाजपचा बालेकिल्ला आणि सुशिक्षित मतदारांचा मोठा भरणा.
कमकुवत दुवे:- सिमेंट रोडच्या चुकीच्या नियोजनामुळे रहिवाशांमध्ये असलेला तीव्र संताप.
संधी:- काँग्रेसच्या महिला नेतृत्वामुळे (नयना झाडे) महिला मतदारांना आकर्षित करण्याची संधी.
धोके :- भाजपमध्ये बाहेरून आलेल्या नेत्यांमुळे (नागुलवार) जुन्या कार्यकर्त्यांची होणारी बंडखोरी.
५. पोल्टीकल वझीरचा ‘मास्टरस्ट्रोक’:-
प्रभाग ३२ मध्ये यावेळी ‘जुन्या विरुद्ध नव्या’ असा संघर्ष पाहायला मिळेल. जो उमेदवार ‘सिमेंट रोडमुळे होणारे जलमय नागपूर’ आणि ‘उद्यानांचे रखडलेले प्रश्न’ सोडवण्याचे ठोस आश्वासन देईल, त्यालाच बजरंग नगरची जनता कौल देईल. कुणबी आणि तेली समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण येथे निर्णायक ठरेल.



