पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव हा भाग पिंपळे सौदागर आणि नवी सांगवीसारख्या विकसित परिसरांच्या मध्यभागी आहे. बाहेरील भागात उद्याने आणि प्रशस्त रस्ते दिसत असले तरी, मूळ गावठाण आणि अंतर्गत वस्त्यांमधील नागरिक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे येथील यंत्रणेवर प्रचंड ताण येत असल्याचे चित्र आहे.
१. पॉलिटिकल वझीरच्या मते मतदारांची आकडेवारी:-
एकूण मतदार: ५१,८५०.
स्त्री-पुरुष प्रमाण: २६,५५९ पुरुष आणि २५,२८६ महिला मतदार.
प्रभागाचे आरक्षण: २९-अ (अनुसूचित जाती महिला), २९-ब (अनुसूचित जमाती महिला), २९-क (नागरिकांचा मागास प्रवर्ग – ओबीसी) आणि २९-ड (सर्वसाधारण खुला गट).
२. प्रभागातील प्रमुख भाग:-
या प्रभागात पिंपळे गुरव गावठाण, लक्ष्मीनगर, भालेकरनगर , तुळजाभवानी नगर,अभंग कॉलनी,वैदू वस्ती, मोरया पार्क, सुदर्शन नगर, शिवनेरी कॉलनी, जवळकरनगर आणि कल्पतरू इस्टेट यांसारख्या भागांचा समावेश होतो.
३. ग्राऊंड रिपोर्ट: “चकचकीत रस्त्यांच्या मागे लपलेल्या व्यथा”
पॉलिटिकल वझीरच्या रिपोर्टनुसार, पिंपळे गुरवमधील नागरिकांना खालील प्रमुख समस्यांचा सामना करावा लागत आहे:
अनियमित पाणीपुरवठा: अनेक भागांत पाणीपुरवठा विस्कळीत असून, पिण्याचे शुद्ध पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे.
वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण: सुदर्शन नगर आणि सृष्टी चौक परिसरात वाहतुकीचे नियोजन कोलमडले आहे. ६० फुटी रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे.
भाजी मंडईचा अभाव: परिसरात स्वतंत्र आणि अधिकृत भाजी मंडई नसल्याने विक्रेते रस्त्यावर बसतात, ज्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो.
अस्वच्छता: उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे. मोलाचा पाडा आणि सुदर्शन नगरमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
४. विकासाचा आढावा प्रभाग २९:-
मार्गी लागलेली कामे
- राजमाता जिजाऊ उद्यानाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण.
- स्मशानभूमीचे नूतनीकरण आणि स्पर्धा परीक्षा केंद्राची उभारणी.
- नदी पत्राच्या कडेने आकर्षक घाट आणि जॉगिंग ट्रॅकचे काम पूर्ण.
रखडलेली कामे
- ‘पीएमपीएल’ बसस्थानकाचे रखडलेले नूतनीकरण.
- स्वतंत्र भाजी मंडईची उभारणी अद्याप कागदावरच.
- अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यात आलेले अपयश.
५. विश्लेषण प्रभाग २९:-
बळ:- विकसित उद्याने, जॉगिंग ट्रॅक आणि आधुनिक शहरी पायाभूत सुविधा.
उणिवा:- अनियमित पाणीपुरवठा आणि अंतर्गत वस्त्यांमधील अरुंद रस्ते.
संधी: – वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ‘सृष्टी चौका’चे नियोजन केल्यास मतदारांचा मोठा पाठिंबा मिळू शकतो.
धोका:- वाढती अतिक्रमणे आणि अस्वच्छतेमुळे परिसराच्या ‘स्मार्ट’ प्रतिमेला धक्का पोहचत आहे.
पॉलिटिकल वझीरची सूचना :-
पिंपळे गुरवमध्ये विजय मिळवण्यासाठी केवळ मोठ्या उद्यानांचे मार्केटिंग करून चालणार नाही. जो उमेदवार ‘गावठाणातील पाणी प्रश्न’ आणि ‘रस्त्यांवरील अतिक्रमण’ हटवून शिस्त लावेल, त्यालाच सजग मतदार आपला कौल देतील.



