नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग २८ हा राजकीयदृष्ट्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपच्या लाटेतही शिवसेनेने या प्रभागात आपले दोन नगरसेवक निवडून आणून सर्वांचे लक्ष वेधले होते. यावेळी परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे.
१. ‘राजकीय वझीर’चा चष्मा: शिवसेनेचा संघर्ष आणि भाजपची रणनीती\
शिवसेनेची पकड: ज्येष्ठ नगरसेवक किशोर कुमेरिया यांना या प्रभागाचे 'अंगद' म्हटले जाते. २००२ पासून ते स्वबळावर आणि शिवसेनेचे अस्तित्व टिकवून आहेत.
भाजपची मोर्चेबांधणी: २०१७ मध्ये भाजपने येथे दोन जागा जिंकल्या होत्या (पिंटू झालके आणि रेखा साकोरे). विधानसभेत भाजपला या प्रभागातून ११ हजारांचे लीड मिळाले होते, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.
काँग्रेसची स्थिती: २०१७ मध्ये काँग्रेसला येथे एकही जागा मिळाली नव्हती, मात्र आमदार अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने यावेळी स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे.
२. प्रभागातील प्रमुख वस्त्या:-
या प्रभागाची व्याप्ती मोठी असून यात खालील प्रमुख भागांचा समावेश होतो:
प्रमुख वस्त्या: रमना मारोती, हरपूरनगर, सुत गिरणी कामगारनगर, ईश्वरनगर, पवनसूतनगर, धन्वंतरीनगर, चिटणीसनगर, दिवाण लेआऊट, दिघोरी, बेलदारनगर, तुकडोजीनगर, गाडगेनगर, डायमंडनगर, भाग्यश्रीनगर, पंडित नगर, न्यू सहकारनगर, प्रगती कॉलनी, सर्वश्रीनगर, कीर्तीनगर.
३. ग्राऊंड रिअॅलिटी
रखडलेली कामे आणि जनतेचा रोष प्रभागात नागरी सुविधांची मोठी ओरड आहे:
रस्त्यांची दुरवस्था: रमना मारोती रोड, साकोरे कॉम्प्लेक्स ते रिंग रोड या रस्त्यांची कामे अर्धवट असून नागरिक धुळीने व खड्ड्यांनी त्रस्त आहेत. ज्योती प्राथमिक शाळा ते हसनबाग रोडचे काम रखडल्याने कसरत करावी लागते.
पाणी आणि ड्रेनेज: वेस्ट वॉटर लाईनवरील सिमेंटचे झाकण तुटलेले असून पावसाळ्यात घरात पाणी शिरण्याच्या तक्रारी आहेत. तसेच न्यू डायमंड नगरमध्ये पाण्याचा प्रेशर कमी आहे.
अस्वच्छता: सफाई कामगार नियमित येत नाहीत आणि उद्यानांमधील ‘ग्रीन जिम’ साहित्याची मोडतोड झाली आहे.
४. इच्छुकांची मोठी फौज :-
भाजप: भाजपकडून माजी नगरसेवक पिंटू झलके, माजी नगरसेवक भारतभूषण गायधने, माजी नगरसेविका रेखा साकोरे, माजी नगरसेविका नीता ठाकरे, भास्कर वाडेकर, विजय आसोले, अमर टिचकुले, मंगेश कुचेवार, गजेंद्र मोहाडीकर, बाळा विटाळकर, अतुल बोंडे, गोपाल ठवकर, लीलाधर लुचे, प्रदीप ठाकरे, डॉ. राजेश गादेवार, सचिन सावरबांधे, चंद्रकांत जंजाळ, परिक्षित उपाध्ये, रवी भुसारी, किरण दातीर, कीर्ती शेंडे, अंजली मोहोड, दीपाली अवचट, वैशाली पिसे, भारती पिंजरकर,लक्ष्मी मोहाडीकर, चंदा धोटे, अर्चना भेंडारकर, छाया बोंदरे, सुरेखा खवास, नंदा येवले, उर्मिला कापगते, करुणा वानखेडे, पुष्पा ढोरे इच्छुक आहेत. शिंदे सेनेकडून माजी नगरसेवक किशोर कुमेरिया, माजी नगरसेविका मंगला गवरे पुन्हा मशाल पेटविण्याच्या तयारीत आहेत.
काँग्रेस: वीणा कुकडे, परमेश्वर राऊत, राहुल अभंग, विलास गावंडे, डॉ. प्रकाश ढगे, प्रवीण गवरे, विवेक सोरते, वीणा कुकडे, नयना झाडे, वंदना सोनटक्के यांची नावे चर्चेत आहेत.
शिवसेना (उद्धव गट): किशोर कुमेरिया, मंगला गवरे.
५. राजकीय वझीरचा स्ट्रॅटेजिक व्ह्यू:-
कुणबी-तेली समीकरण:- या प्रभागात कुणबी आणि तेली समाजाचे मोठे प्राबल्य आहे, जे निवडणुकीचे निकाल फिरवू शकतात.
बंडखोरीचे आव्हान:- भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने तिकीट कापल्या गेल्यास बंडखोरी रोखणे हे मोठे आव्हान असेल.
लोधी समाज:- लोधी समाजाची ताकद सातत्याने शिवसेनेचे किशोर कुमेरिया यांच्या पाठीशी राहिली आहे.
निष्कर्ष:
प्रभाग २८ मध्ये जो उमेदवार ‘रस्ते आणि पाणी’ या मूलभूत प्रश्नांवर लोकांचा विश्वास जिंकेल, तोच विजयी ठरेल. शिवसेनेचा गड वाचणार की भाजप ‘क्लीन स्वीप’ देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.



