नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग २७ हा यावेळी शहराच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. २०१७ मध्ये येथे भाजपचे वर्चस्व होते, मात्र काँग्रेसचे दिग्गज नेते तानाजी वनवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केल्याने या प्रभागातील लढत आता ‘चौरंगी’ होण्याचे संकेत मिळत आहेत.
१. ‘राजकीय वझीर’चा चष्मा: बदललेली समीकरणे
पक्षांतराचा फटका: काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे आता राष्ट्रवादीत गेल्याने काँग्रेसची पारंपरिक मते विभागली जाण्याची शक्यता आहे.
भाजपचा बालेकिल्ला: २०१७ मध्ये भाजपचे ३ नगरसेवक निवडून आले होते, तर काँग्रेसचा फक्त १ नगरसेवक (तानाजी वनवे) विजयी झाला होता.
शिवसेनेची भूमिका: उद्धव ठाकरे गटाची ताकद या प्रभागात निर्णायक ठरू शकते, कारण गेल्या वेळी त्यांच्या उमेदवारांनी लक्षणीय मते घेतली होती.
२. प्रभागातील लोकसंख्या:-
एकूण लोकसंख्या: सुमारे ६६,८२८ (२०१७ च्या आकडेवारीनुसार, आता ही संख्या ७० हजारांच्या पुढे गेली आहे)
प्रमुख वस्त्या: नेहरूनगर, ओमनगर, सुदामपुरी, गुरुदेव नगर, मिरे ले-आऊट, माकडे ले-आऊट, बापू नगर आनंद नगर, नंदनवन झोपडपट्टी, राजेन्द्र नगर, न्यू प्रशांत नगर, न्यू नंदनवन कॉलनी हसनबाग, सद्भावना नगर, वृंदावन नगर नंदनवन- एम. आय. जी व एल. आय.जी. कॉलनी आयुर्वेदिक कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज ले-आऊट
सामाजिक समीकरण: या प्रभागात तेली, कुणबी, मुस्लिम आणि दलित समाजातील मतदारांची संख्या मोठी असून 'कुणबी' मते येथे निर्णायक ठरतात.
३. ग्राऊंड रिअॅलिटी: जनतेच्या तक्रारी आणि वास्तव:-
प्रशासकीय राजवटीत या प्रभागात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे
पाणी समस्या: नागपूरला २४ तास पाणी देण्याची घोषणा झाली असली, तरी या प्रभागातील अनेक वस्त्यांत आजही दिवसातून केवळ १ तास पाणी येते.
नाग नदीचा धोका: आनंद नगर परिसरात नाग नदीला संरक्षक भिंत नसल्यामुळे पावसाळ्यात लोकांच्या घरात पुराचे पाणी शिरते.
मैदानांची दुरावस्था: आयुर्वेदिक ले-आउट, नंदनवन आणि ओमनगर येथील मैदानांची कामे वर्षानुवर्षे अर्धवट आहेत.
आरोग्य सेवा: आयुर्वेदिक ले-आउटमधील सरकारी दवाखान्याची दुरवस्था झाली असून, प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
४. इच्छुकांची यादी :-
भाजप:- माजी नगरसेविका दिव्या धुरडे, वंदना भुरे, हरिश दिकोंडवार यांच्यासह प्रवीण गिऱ्हे, मंगेश साखरकर, राजेश समर्थ, अजय सराडकर, बल्लू बारे चेतना सातपुते, वैशाली हनवते, सुरेखा मदनकर, वैभव शेटे, सचिन वातखडे, आम्रपाली मेश्राम, रुपेश मेश्राम
काँग्रेस:- नीता वंजारी, शेख नूरजहाँ परवीन मुजीब, शेख मुजीब, रवींद्रकुमार बावनकर, राकेश कनोजे, मिलिंद दुपारे, नीलेश खोरगडे, प्रशांत आचकर, वैशाली लांडगे, राहुल कांबळे
राष्ट्रवादी (अजित पवार):- तानाजी वनवे, मालूताई वनवे, विलास माकडे, प्रसाद झोड
५. विश्लेषण: प्रभाग २७
(जमेच्या बाजू):- भाजपचे बूथ लेव्हलवरील मजबूत संघटन
(कमकुवत दुवे):- नाग नदीच्या प्रश्नामुळे आणि पाणी टंचाईमुळे सत्ताधाऱ्यांविरुद्ध रोष
(संधी):- काँग्रेसच्या मतात होणाऱ्या विभाजनाचा भाजपला फायदा होण्याची संधी
(धोके):- महायुती आणि महाविकास आघाडी न झाल्यास चौरंगी लढतीत अनपेक्षित निकाल लागण्याचा धोका.
राजकीय वझीरचा ‘मास्टरस्ट्रोक’:-
प्रभाग २७ मध्ये ‘तानाजी वनवे यांची वैयक्तिक ताकद’ विरुद्ध ‘भाजपचे चिन्ह’ अशी ही लढाई असेल. जर काँग्रेसने नवा आणि तगडा चेहरा दिला नाही, तर भाजपचा विजय सुकर होऊ शकतो. मात्र, नाग नदीलगतच्या वस्त्यांमधील संताप कोणाला घरी बसवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.



