पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग २४ हा १९८६ मध्ये महापालिकेत समाविष्ट झाला. डांगे चौक आणि आदित्य बिर्ला हॉस्पिटलसारखी महत्त्वाची ठिकाणे या प्रभागात येतात. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनेज चोकअप आणि पदपथांवरील अतिक्रमणांसारख्या साध्या वाटणाऱ्या समस्या सुटत नसल्याने येथील नागरिक हवालदिल झाले आहेत.
१. पॉलिटिकल वझीरच्या मते मतदारांची आकडेवारी:-
एकूण मतदार: ४०,५९६
मतदार विभागणी: २१,५०५ पुरुष आणि १९,०८७ महिला मतदार
प्रभागाचे आरक्षण: २४-अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग), २४-ब (सर्वसाधारण महिला), २४-क (सर्वसाधारण महिला) आणि २४-ड (सर्वसाधारण).
२. या प्रभागामधील प्रमुख भाग:-
या प्रभागात आदित्य बिर्ला रुग्णालय, दत्तनगर,पद्मजी पेपरमिल, गंगा ओशियन गणेशनगर,मिडोज,क्रांतिवीर नगर, तुळजाई कॉलनी, कान्हयाया पार्क, सोळा नंबर, बेलठिका नगर, जय मल्हार नगर, महाराष्ट्र कॉलनी, यशदा कॉलनी, गुजरनगर, लक्ष्मण नगर, डांगे चौक मंगलनगर यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांचा समावेश होतो.
३. ग्राऊंड रिपोर्ट: “समस्या सुटण्याची गरज”
पॉलिटिकल वझीरच्या रिपोर्टनुसार, या प्रभागातील काही गंभीर प्रश्न खालीलप्रमाणे आहेत:
ड्रेनेजचा विळखा: महाराष्ट्र कॉलनी आणि यशदा कॉलनी परिसरात ड्रेनेज चोकअपची समस्या वर्षानुवर्षे तशीच आहे, ज्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो.
डांगे चौकातील डोकेदुखी: डांगे चौकात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, खासगी ट्रॅव्हल्सचे अनधिकृत थांबे आणि पदपथांवरील अतिक्रमणे यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे.
केजुदेवी धरणाचे प्रदूषण: केजुदेवी बंधारा परिसरात पवना नदीचे प्रदूषण आणि परिसरातील अस्वच्छता हा चिंतेचा विषय बनला आहे.
सुरक्षेचा अभाव: डांगे चौकात दिवसाढवळ्या चालणारे जुगार अड्डे आणि रात्रीच्या वेळी उघड्यावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या टोळ्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
४. विकासाचा आढावा: प्रभाग २४
मार्गी लागलेली कामे:-
- डांगे चौक आणि लक्ष्मण नगर उद्यानांचे सुशोभीकरण.
- बहुतांश अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण.
- शिवसृष्टी आणि केजुदेवी बोटक्लब उद्यानाचा विकास.
रखडलेली कामे:-
- डांगे चौकातील आठवडे बाजार आणि वाहतुकीचे नियोजन.
- जुन्या ड्रेनेज वाहिन्या बदलून मोठी वाहिनी टाकण्याचे काम.
- सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव आणि पदपथ रुंदीकरण.
५. विश्लेषण: प्रभाग २४
बळ:- विकसित व्यावसायिक केंद्र आणि आदित्य बिर्ला रुग्णालयासारखी मोठी आरोग्य सुविधा
उणिवा:- ड्रेनेजची जुनी यंत्रणा आणि पदपथांवरील प्रचंड अतिक्रमणे
संधी:- डांगे चौकातील वाहतूक कोंडी फोडल्यास आणि ड्रेनेजचा प्रश्न कायमचा सोडवल्यास मतदारांचा मोठा पाठिंबा मिळू शकतो
धोका:- गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि नदी प्रदूषणाकडे होणारे दुर्लक्ष आरोग्यासाठी घातक ठरू शकते
पॉलिटिकल वझीरच्या सूचना:-
प्रभाग २४ मध्ये विजय मिळवण्यासाठी मोठ्या घोषणांपेक्षा ड्रेनेज चोकअप आणि ट्रॅफिक या दोन मूलभूत प्रश्नांवर काम करणे गरजेचे आहे. जो उमेदवार ‘डांगे चौकातील अतिक्रमणे’ हटवून शिस्त लावेल, थेरगावची जनता त्यालाच आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडेल.



