पवारांवरच्या वादग्रस्त विधानावरून सदाभाऊ खोत यांना मिटकरींचा टोला

Pawar should change his last name - Sadabhau Khot

मंडळी राजकारण म्हटलं की एकमेकांची खिल्ली उडवणे याला कुठलाही राजकीय नेता अपवाद नाही. महाराष्ट्रातील राजकारणात सध्या ईडीच्या चौकशीचा धुमाकूळ चालू असताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करून राजकीय क्षेत्रातआणखी एक ट्विस्ट आणला आहे.

 

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना आडनाव बदलून ‘आगलावे’ करावं असा सल्ला दिला आहे. सांगलीतील अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्या संबंधी बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

 

ते म्हणाले की,

 

” शरद पवार हे महान व्यक्ती आहे. त्यांनी या राज्यामध्ये काड्या करण्यापलीकडे काही केलं नाही. जाईल तिथं आग लावायची आणि दुसऱ्या घराला परत आग लावायला निघून जायचं. त्यांचं सर्व आयुष्य हे आग लावण्यामध्येच गेलं आहे. त्यामुळे त्यांनी आडनाव बदलून ते ‘आगलावे’ करावं.”

 

अशी टीका सदाभाऊ खोत यांनी पवारांवर केली आहे. यावर अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया आली असून अद्याप शरद पवारांची प्रतिक्रिया येणे बाकी आहे. 

 

काय म्हणाले मिटकरी? 

 

सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला अमोल मिटकरी यांनी प्रतिउत्तर दिल आहे. ते म्हणाले की,

 

” शरद पवारांवर बोलताना आपण एवढ्या महान सुर्यासमोर बोलत आहोत. तिकडे थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंकी आपल्यावर उडू शकते इतकं ज्ञान सदाभाऊंना असावं. सदाभाऊंना पुढील आमदारकी टिकवायची आहे. सदाभाऊ किंवा त्यांचा मित्र हे स्वतः बोलत नाहीत. यामागे फडणवीसांचा मास्टरमाईंड आहे. अस माझं स्पष्ट मत आहे.”

 

अस अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. मात्र आता सदाभाऊ खोत यांना शरद पवार काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *