या साठी मोर्चे काढा, आम्ही शांत बसणार नाही वगैरे वगैरे..
मागील वर्षी आम्ही एक ऑक्सिजन अभावी जीव जातांना माणसं बघितली…त्या वेळी आमचे माननीय लोक राजकीय सभा घेण्यात व्यस्त होते.. आजही अनेक आव्हाने उभे करून देशातील स्थानिक स्थिती काय आहे न बघता अस्थिरता कशी उभी करावी या कडे नेत्यांची लक्ष जास्त…
हे करा , ते करा , आम्ही असे करु , तलवार हाती घेऊ वगैरे म्हणणार्या नेत्यांची मुले कधीच जमीनीवर लढायला नसतात. पण कार्यकुत्रे म्हणजे नेत्यांना बाप आणि पक्षाला धर्म मानुन अगदी लाठी वगैरे घेऊन नेहमी तयारच , आजही भारतात जर कोविड ची चौथी लाट आली तर आपण किती तयार आहो आम्हाला माहिती नाही ?
चिथावणीखोर भाषण करून लोकांचे प्रश्न मिटणार आहेत काय? अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
सद्यस्थितीत ग्रोथ रेट किती घसरला आम्हाला घेणेदेणे नाही , तीन लाख लोकांच्या नौकर्या फक्त मागील महिन्यात गेल्या कुणाला फरक पडत नाही , महागाई किती वाढली ते बघणार नाही,शेतकरी आत्महत्या , शैक्षणिक दर्जा, त्या बद्दल आम्ही सरकारला कधीच जाब सुद्धा विचारणार नाही..
आणि राजकीय धंदा करणार्या लोकांना त्याशी काही घेणे देणे सुद्धा नाही कारण मरणारा हा त्यांच्या घरचा नसतो मरतो तो सामान्य व्यक्ती.
शिवसेना स बोलले की मराठी अस्मिता , बिजेपी ला बोलले की राष्ट्रधर्म , राष्ट्रवादी कांग्रेस ला बोलले की पुरोगामीत्व …. नेमके पक्ष या सर्व गोष्टी चे ठेकेदार कधी झाले ? हा बिजेपी चा , हा कांग्रेस चा , हा राष्ट्रवादी चा म्हणण्यापेक्षा..
युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणणार- बाळासाहेब थोरात
मी माझ्या बापाचा बोलणं महत्त्वाचे असतं..
तुम्ही प्रश्न केला की लगेच पाकिस्तान जाओ म्हणणारी केंद्र सरकार , राज्यात विज पासून शेतकरी पर्यंत असंख्य प्रश्न असताना रोज नवीन भानगड करणारी राज्य सरकार..
शेवटी सर्व एकाच माळेचे मणी..
“जोपर्यंत रोजगारावर सरकारचे नियंत्रण राहील,माध्यम,शाळा आणि जनमत बनवन्याची सर्व साधने सरकारच्या हाताखाली असतील,जोपर्यंत सर्व कुशल आणि प्रशिक्षीत लोकांवर सरकारचे नियंत्रण असेल;
निवडणुकांवर प्रभाव टाकन्यासाठी अमर्याद पैसा असेल,जोपर्यंत सत्ताधारी पक्षच कायदे बनविल;
जोपर्यंत कायद्यांचे अभ्यासक सर्वाधिक पैसे देणाऱ्यांच्यामागे उभे राहतील तोपर्यंत देशात फक्त नावापुरती समानता असेल.”
——————- सरदार भगतसिंग.
अक्षय चंदेल
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- राणा दाम्पत्याची अखेर माघार
- अमोल मिटकरींना अजित पवारांची ताकीद
- सार्वकालिक आंबेडकर
- भाजप देशात विषारी वातावरण पसरवत आहे- शरद पवार
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
FB : https://www.facebook.com/PoliticalWazir