प्रभाग १० मध्ये यावेळी मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. २०१७ मध्ये काँग्रेसने या प्रभागावर निर्विवाद वर्चस्व गाजवले होते, मात्र त्यानंतर झालेले पक्षांतर आणि नेत्यांच्या घरवापसीमुळे इथली समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
१. प्रभागाचा लेखाजोखा:
एकूण मतदार: सुमारे ६०,०००.मतदार
स्वरूप: कुणबी, हिंदी भाषिक, मुस्लिम, अनुसूचित जाती, आदिवासी आणि पोलीस वसाहतीतील मतदारांची मोठी संख्या या प्रभागात निर्णायक ठरते.
२०१७ चा निकाल: गार्गी प्रशांत चोपडा, नितीश ग्वालबंसी, साक्षी राऊत आणि रश्मी धुर्वे (सर्व काँग्रेस) विजयी झाले होते.
२. प्रमुख वस्त्या आणि ग्राऊंड रिअॅलिटी
या प्रभागातील प्रमुख वस्त्यांमध्ये नागरी समस्यांचा डोंगर उभा आहे.
प्रमुख वस्त्या: बोरगाव, दिनशॉ फॅक्टरी कुतुबशहानगर, शीलानगर, पोलिस लाइन टाकळी, समाधाननगर, आदर्श कॉलनी, पेन्शननगर, अवस्थीनगर, सादिकाबाद, मानकापूर मेन्टल हॉस्पिटल, दर्जी मोहल्ला, बैरामजी टाऊन, राजनगर, गॉड मोहल्ला, एनएडीटी कॅम्पस, आंबेडकरनगर, म्हाडा कॉलनी, आकारनगर, मानकापूर पॉवर स्टेशन.
ज्वलंत प्रश्न: पोलीस लाईन तलावाचे रखडलेले सौंदर्यीकरण, पोलीस लाईन टाकळीमधील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा, आणि गोरेवाडा जंगलाला लागून असलेल्या नाल्याला संरक्षण भिंतीचा अभाव.सुरक्षेचा प्रश्न: गोकुळधाम सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाचे अरुंद स्वरूप आणि ठिकठिकाणी वाढलेली अतिक्रमणे यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.
३. इच्छुकांची फौज आणि तगडी स्पर्धा :
यावेळी भाजप आणि काँग्रेसमध्ये ‘काट्याची टक्कर’ पाहायला मिळणार आहे.
काँग्रेसकडून: विद्यमान नगरसेविका साक्षी राऊत, रश्मी धुर्वे यांच्यासह प्रमोद ठाकूर, पंकज शुक्ला, आणि तोसिफ खान इच्छुक आहेत.
भाजपकडून: माजी नगरसेवक रमेश चोपडे, त्यांच्या पत्नी वैशाली चोपडे, आणि शीला मोहोड यांची नावे चर्चेत आहेत.
तसेच युवा मोर्च्याचे कमलेश पांडे आणि बंटी दीक्षित सक्रिय आहेत.
पक्षांतराचा फटका: माजी नगरसेवक प्रशांत चोपडा यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये जाऊन पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे, तर नितीश ग्वालबंसी यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू गिरीश ग्वालबंसी आता भाजपमध्ये आहेत.
४. राजकीय वझीरचे विश्लेषण पक्षस्थिती :
काँग्रेस: विधानसभा निवडणुकीत या प्रभागातून काँग्रेसला ४,५०० हून अधिक मतांची आघाडी मिळाली होती, जी त्यांची मोठी ताकद आहे.
भाजप: माजी नगरसेवकांच्या कुटुंबातील सदस्यांना मैदानात उतरवून आणि पक्षांतराचा फायदा घेत जागा काबीज करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
बसपा/अपक्ष: बसपाचे पत्ते अद्याप उघड झालेले नाहीत, मात्र अरुण डवरे यांच्यासारखे अपक्ष उमेदवार मतांचे गणित बिघडू शकतात.
पॉलिटिकल वझीर सल्ला:
प्रभाग १० मध्ये ‘पोलीस लाईन तलाव’ आणि ‘नाल्याची भिंत’ हे दोन मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी राहतील. जो उमेदवार या मूलभूत सुविधांच्या पूर्ततेचे ठोस आश्वासन देईल, त्याला वस्त्यांमधील मतदारांचा पाठिंबा मिळणे सोपे जाईल.



