मी मोदीसाहेबांव्यतिरिक्त दोन कोटींपेक्षा अधिक लोकांना मारणार आहे – अज्ञात

मंडळी भारतीय देशामध्ये नेत्यांवर अज्ञातांचा हल्ला होणे काही नवीन गोष्ट नाही. मात्र अशा गोष्टी पुन्हा घडणे हे देशाला आणि माणुसकीला काळिमा फासणार आहे. याआधी भारतीय देशाच्या इतिहासामध्ये प्रधानमंत्री इंदिरा गांधी आणि काँग्रेस नेते यांच्यावर अज्ञातांनी हल्ला करून त्यांना ठार केलं होतं.

 

त्यामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली होती आणि आता सुद्धा काही अज्ञातांनी प्रधानमंत्री मोदींसाहेबांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी देणारा मेल राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए आणि इतर काही तपास यंत्रणांना आल्याची माहिती समोर आली आहे.

 

आपल्याकडे २० आरडीएक्स असून देशातल्या २० महत्वाच्या शहरांमध्ये मोठे ब्लास्ट करणार असल्याच या मेलमध्ये म्हटलं आहे. त्यानुसार एनआयएन तपास सुरू केला असून इमेल नेमका कुणी पाठवला आहे, याविषयी शोध सुरू करण्यात आला आहे. हा इमेल एनआयए मुंबईला महिन्याभऱ्यापूर्वीच आला असल्याचं तपासात माहीती पडलय. हा इमेल इतर तपास यंत्रणांना देखील पाठवल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. 

 

देशातलं मोठी व्यक्ती म्हटली की अशाप्रकारच्या धमक्या येतच असतात. किंवा देशातील जनतेला भरकटवायसाठीपण अशा गोष्टी वापरल्या जाऊ शकतात. हे प्रत्येक समजदार नागरिकाने समजून घेणे महत्वाचे आहे. 

 

आज आपल्या देशामध्ये अनेक प्रश्न आहेत. अनेक प्रश्नांसाठी अनेक ठिकाणी आंदोलने चालू आहेत. मात्र सरकार अशा मुद्द्यांपासून जनतेच लक्ष विचलित व्हावं यासाठी असल्या प्रकारचे खेळ खेळले जाऊ शकतात. हे सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. मात्र अखेर सत्य काय आहे हे राष्ट्रीय यंत्रणेच्या तपासामध्येच माहिती होणार.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *