मुस्लिमांसाठी दरवाजे चारही बाजूने बंद केले जात आहे- अबू आजमी

Doors are being closed for Muslims on all sides - Abu Azmi
मंडळी कर्नाटक उच्चन्यायालयाच्या निकालाने हिजाब प्रकरणात पुन्हा एकदा ट्विस्ट आणला आहे. हिजाब घालणे ही आवश्यक धार्मिक प्रथा नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरलेलं हिजाब प्रकरण पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. न्यायालयाने म्हटले की, शालेय गणवेशावर विद्यार्थी आक्षेप घेऊ शकत नाही.
 
 
मात्र आता या निर्णयावरून देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांनी या प्रकरणाबद्दल प्रतिक्रिया दिली असून मुस्लिम समाजासोबत अन्याय होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असतांना त्यांनी सांगितले की,
 
 
” कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत आहे. पण हा निर्णय चुकीचा आहे. कोण काय घालणार आणि काय खाणार हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. शीख धर्मीयांसाठी पगडी आणि तलवार त्यांच्या समाजात अनिवार्य आहे आणि त्यांना कोणी थांबवू शकत नाही. शीख व्यक्तीला तुम्ही पगडी काढायला सांगाल का? तेव्हा तुम्ही का बोलत नाहीत. मुस्लिम समाजासोबत अन्याय होत आहे. कोर्टाने काहीही म्हटले तरी मुस्लिम समाजमध्ये हिजाब घालणे हा इस्लामचा भाग आहे. आपल्या पतीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीसमोर चेहरा खुला ठेवून जाणे गुन्हा आहे. हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नसल्याचे कसे मी मान्य करू? आम्ही हे लहानपणापासून वाचत आलो आहोत. या निर्णयामुळे मुस्लिमांचे दरवाजे चारही बाजूने बंद केले जात आहेत.”
 
 
 
असे अबू आजमी यांनी सांगितले. कर्नाटकमध्ये गाजलेलं हिजाबच प्रकरण हे संपूर्ण देशभरात असंतोष पसरवणार होत. निवडणूका जवळ आलेल्या कारणाने राजकीय टोळ्यांनी हिंदू मुस्लिम वादाचे मुद्दे उखरून काढले होते.
 
 
 
 ऐन निवडणूकीच्या वेळेलाच हिजाब प्रकरण कस काय? 
 
 

               निवडणुकीच्या वेळेला राजकीय टोळ्यांनी मुद्दाम उखरून काढलेला हिंदू मुस्लिम वाद निव्वळ मते लुटण्यासाठी निर्माण केल्या गेला होता. मात्र जशी निवडणूक संपली संपूर्ण हिजाब प्रकरण शांत झालेलं आपल्या सर्वांना पाहायला मिळाल. अशा राजकीय टोळ्यांच्या दंगल भडकावू मनसुब्यापासून सामान्य लोकांनी दूर राहणे गरजेचे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *