तिथीनुसार शिवजयंतीची कारण नसताना चर्चा नको- अजित पवार

Don't discuss when there is no reason for Shiv Jayanti as per the date- Ajit Pawar
मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार शिवजयंतीचा वाद काही नवीन नाही. ब्राम्हणी विचारधारेचे लोक शिवरायांची जयंती हे तिथीनुसार साजरी करत असतात. तर १९ फेब्रुवारीला शिवरायांची खरी शिवजयंती महात्मा फुले यांनी सुरू केली होती. मात्र शिवरायांच्या जयंतीचा वाद हा आता विधिमंडळात पण उफाळून आला आहे.
 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला वंदन केल्याने सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. सरकारची नेमकी भूमिका काय आहे. अशी विचारणा करत त्यांनी मुख्यमंत्री साजरी करत असतील तर सरकार म्हणूनही आज शिवजयंती साजरी करण्याचा आदेश द्या अशी मागणी त्यांनी केली.
 
 
मुनगंटीवार म्हणाले की,
 
 
” आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार शिवजयंती असून मुख्यमंत्री स्वतः एका कार्यक्रमात गेले आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आहेत. राज्य सरकारची नेमकी भूमिका काय?”
 
 
अशी विचारणा सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यावर विधिमंडळातील वातावरण चांगलच तापलं होत. 
 
 
मुनगंटीवारांना अजित पवारांचं उत्तर 
 
 
        महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा वाद थेट विधिमंडळात पोहचल्यानंतर अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांना चांगलच प्रतिउत्तर दिल आहे. अजित पवार यांनी जवाब देतांना म्हटलं की,
 
 
 
” सरकारच्या वतीने १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तिथे गेले आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते तेव्हापासून शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आली आहे. आम्हीदेखील सरकारमध्ये असताना तारखेप्रमाणे साजरे करायचो. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, सपा, भाजपा कोणत्याही पक्षाच्या सदस्याला तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करायची असेल तर महाराजांच्या पुतळ्याला जाऊन अभिवादन करू शकतात. कारण नसतांना वेगळी चर्चा नको. सरकारी अधिकाऱ्याला १९ फेब्रुवारीला सरकारी सुट्टी देतो त्याप्रमाणे ते साजरी करतात. आज सुट्टी नसून काम सुरू आहे. अशी अजित पवारांनी विधिमंडळात प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांना दिली. आता हा शिवजयंतीचा चिघळलेला वाद कुठल्या वळणावर जाईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *