पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १९९७ मधील सीमावाढीमध्ये मामुर्डी, किवळे आणि रावेत या गावांचा समावेश झाला. गेल्या दोन दशकांत या भागात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून, अनेक ‘स्मार्ट’ गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. मात्र, विकासाचा हा वेग केवळ सोसायट्यांपुरता मर्यादित राहिला असून, आजही हा प्रभाग मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र आहे.
१. पॉलिटिकल वझीरच्या मते मतदारांचे गणित:-
एकूण मतदार: ७५,१०५
मतदार विभागणी: ३९,२२४ पुरुष आणि ३५,८७५ महिला मतदार.
प्रभागाचे आरक्षण: १६-अ (अनुसूचित जाती), १६-ब (ओबीसी महिला), १६-क (महिला) आणि १६-ड (खुला).
२. प्रभागामधील समाविष्ट भाग:-
या प्रभागात मामुर्डी, किवळे, रावेत, रावेत प्राधिकरण, गुरुद्वारा चौक, चिंतामणी चौक, वाल्हेरकरवाडी या भागांचा समावेश होतो.
३. ग्राऊंड रिपोर्ट: “कामं कागदावर, प्रश्न जमिनीवर!
पॉलिटिकल वझीरच्या माहितीनुसार, येथील रहिवासी खालील समस्यांनी त्रस्त आहेत:
पाणी समस्या: रावेत जलशुद्धीकरण केंद्र याच भागात असूनही किवळे आणि मामुर्डी परिसरात पाणी कमी दाबाने येते. काही सोसायट्यांना आजही टँकरवर लाखो रुपये खर्च करावे लागतात.
वाहतूक आणि रस्ते: मुकाई चौक ते भोंडवे चौक दरम्यान बीआरटी आणि मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीचे नियोजन कोलमडले आहे. अंतर्गत रस्ते अरुंद असून रावेत-किवळे जोडणारा रेल्वे उड्डाणपूल अद्याप रखडलेला आहे.
आरोग्य आणि शिक्षण: प्रभागात महापालिकेचे स्वतःचे सुसज्ज रुग्णालय नाही. माध्यमिक शाळा आणि स्वतंत्र महाविद्यालय उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
सुरक्षा: वाढती लोकसंख्या पाहता येथे स्वतंत्र पोलीस चौकी आणि अग्निशमन केंद्राची नितांत गरज आहे.’
४. विकासाचे रिपोर्ट कार्ड:-
मार्गी लागलेली कामे
- प्राधिकरण सेक्टर २९ आणि ३२ मध्ये नवीन उद्याने व जॉगिंग ट्रॅक.
- बीआरटी मार्ग आणि मुकाई चौकात हायमास्ट दिव्यांची सोय.
- काही भागांत भूमिगत विद्युत वाहिन्यांचे काम पूर्ण.
रखडलेली कामे:-
- मुकाई चौक ते किवळे रस्त्याचे रखडलेले रुंदीकरण.
- इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प आणि सांडपाणी व्यवस्थापन.
- मामुर्डी आणि किवळे भागातील अंतर्गत रस्ते व ड्रेनेज व्यवस्था
- गुरुद्वारा चौक जुन्या रेल्वे बोगद्यात पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही.
५. विश्लेषण प्रभाग १६:-
बळ: सुशिक्षित नोकरदार वर्ग आणि वेगाने वाढणारा उच्चभ्रू रहिवासी परिसर.
उणिवा: पाणी टंचाई आणि आरक्षित जागा ताब्यात नसल्याने रखडलेले सार्वजनिक प्रकल्प.
संधी: नवीन शाळा, रुग्णालय आणि रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न जो सोडवेल, त्याला मतदारांचा मोठा कौल मिळेल.
धोका: मुकाई चौकातील सततची वाहतूक कोंडी आणि नदीपात्रातील वाढती दुर्गंधी.
पॉलिटिकल वझीरच्या सूचना:-
प्रभाग १६ च्या निवडणुकीत यावेळी पाणी आणि वाहतूक कोंडी हे सर्वात मोठे मुद्दे असतील. जो उमेदवार ‘प्राधिकरणाच्या आरक्षित जागा’ विकसित करून दाखवेल आणि ‘मामुर्डी-किवळे’ या दुर्लक्षित भागाला मुख्य प्रवाहाशी जोडेल, तोच या प्रभागाचा खरा लोकप्रतिनिधी ठरेल.



