पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग १८ हा ऐतिहासिक मोरया गोसावी मंदिर आणि क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या वारशाने पुनीत झालेला भाग आहे. मात्र, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या भागात नागरी समस्यांचा डोंगर उभा असून, गावठाणातील अरुंद रस्ते आणि पवना नदीच्या प्रदूषणाने नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
१. पॉलिटिकल वझीरचा मते : मतदारांची आकडेवारी:-
एकूण मतदार: ५४,८९२.
मतदार विभागणी: २७,८७८ पुरुष आणि २७,०१२ महिला मतदार.
प्रभागाचे आरक्षण: १८-अ (मागास प्रवर्ग महिला राखीव), १८-ब (महिला राखीव), १८-क (खुला) आणि १८-ड (खुला)
२. या प्रभागामधील प्रमुख भाग:-
या प्रभागात चिंचवड गावठाण, केशव नगर, तानाजी नगर, एस के एफ कॉलनी, रस्टन कॉलनी, पवनानगर, वेताळनगर, काकडे पार्क आणि मोरया राज पार्क या महत्त्वाच्या भागांचा समावेश होतो.
३. ग्राऊंड रिपोर्ट: “रस्ते अरुंद, कोंडी प्रचंड!”
पॉलिटिकल वझीरच्या रिपोर्टनुसार, या प्रभागातील सर्वात ज्वलंत समस्या खालीलप्रमाणे आहेत:
वाहतूक कोंडी: गांधी पेठ, चापेकर चौक आणि मुख्य बाजारपेठेत सणासुदीच्या काळात पाय ठेवायलाही जागा उरत नाही. गावठाणातील अंतर्गत रस्ते अत्यंत अरुंद असून पदपथांवर अनधिकृत वाहने उभी केल्यामुळे पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होते.
पवना नदी प्रदूषण: शहराची जीवनवाहिनी असलेल्या पवना नदीत थेट सांडपाणी आणि कंपन्यांचे रसायने सोडली जात असल्याने नदी प्रदूषित झाली आहे. थेरगावच्या बाजूने पाणी अडवले जात असल्याने नदीत वारंवार फेस तयार होत असून परिसरात दुर्गंधी पसरते.
अपूर्ण विकासकामे: चिंचवडच्या बाजूने बटरफ्लाय पुलाचे जोड रस्ते अद्याप प्रलंबित आहेत. पुलावरून गावठाणात शिरताना रस्ते अचानक अरुंद होतात, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
मैदानांचा अभाव: चिंचवडगाव परिसरात खेळाच्या मैदानांची कमतरता असून, झोपडपट्टी पुनर्वसनाचे अनेक प्रकल्प अद्याप रखडलेले आहेत.
४. विकासाचा आढावा: प्रभाग १८
मार्गी लागलेली कामे:-
- चिंचवड ते थेरगाव जोडणाऱ्या ‘बटरफ्लाय’ पुलाचे काम पूर्ण.
- गावठाणातील काही रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण.
- नदी लगतच्या भागात गार्डनच्या कामाला सुरुवात.
रखडलेली कामे:-
- पुलाच्या बाजूचे जोड रस्ते आणि सायकल ट्रॅकचे काम अपूर्ण.
- पवना नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची प्रतीक्षा.
- बाजारपेठेत बहुमजली पार्किंग आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांची निर्मिती.
५. विश्लेषण प्रभाग १८:-
(बळ): मोरया गोसावी मंदिरामुळे असलेले धार्मिक महत्त्व आणि मोठी बाजारपेठ.
(उणिवा): नियोजनाचा अभाव असलेला अरुंद रस्ते आणि वाहतुकीचा विळखा.
(संधी): तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सुसज्ज पार्किंग आणि नदी सुधार प्रकल्प राबवल्यास नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळेल.
(धोका): नदी प्रदूषणामुळे पसरणारे आजार आणि वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांची कमी होणारी संख्या
पॉलिटिकल वझीरचं संकेत:-
प्रभाग १८ मध्ये निवडून येण्यासाठी केवळ ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून गौरव करून चालणार नाही. जो उमेदवार पवना नदीची स्वच्छता आणि बाजारपेठेतील वाहतूक कोंडी यावर कायमस्वरूपी तांत्रिक तोडगा काढेल, चिंचवडची जनता त्यालाच आपला मंत्री निवडेल.



