पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग १२ हा औद्योगिक पट्ट्यातील एक अतिशय संवेदनशील प्रभाग आहे. देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या सीमेवर असल्याने येथील मोठा परिसर ‘रेड झोन’ अंतर्गत येतो. यामुळे घरांचे बांधकाम असो वा मोठ्या प्रकल्पांची मंजुरी, येथे प्रत्येक गोष्ट तांत्रिक अडचणींत अडकलेली दिसते.
१. पॉलिटिकल वझीरच्या मते:- मतदारांचे गणित
एकूण मतदार: ४४,६८५.
मतदार विभागणी: पुरुष मतदार (२४,६४७) आणि महिला मतदार (१९,९८२).
सामाजिक समीकरण: येथे कष्टकरी कामगार आणि मध्यमवर्गीय मतदारांची संख्या मोठी आहे.
आरक्षण: हा प्रभाग चार जागांसाठी आरक्षित आहे: ‘१२-अ (ओबीसी)’, ‘१२-ब (महिला)’, ‘१२-क (महिला)’ आणि ‘१२-ड (सर्वसाधारण खुला)’.
२. ‘बॅटल ग्राऊंड’ मधील प्रमुख वस्त्या:-
या प्रभागाची व्याप्ती मोठी असून यात खालील भागांचा समावेश होतो:
तळवडे, ज्योतिबानगर, गणेश नगर, रुपिनगर, सहयोग नगर आणि त्रिवेणीनगर.
३. ग्राऊंड रिपोर्ट: प्रश्नांचे ‘धगधगते’ वास्तव
प्रभागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय:
रेड झोनचा अडथळा: रेड झोनच्या निर्बंधांमुळे नवीन बांधकामांना परवानगी मिळत नाही आणि जुन्या घरांच्या दुरुस्तीसाठीही अडचण येत आहे.
वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण: तळवडे-त्रिवेणीनगर रस्त्यावर अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते, त्यातच रुपिनगर मुख्य बाजारपेठेत अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत.
पाणी आणि ड्रेनेज: रुपिनगर आणि त्रिवेणीनगर भागात कमी दाबाने आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. जुनी भूमिगत सांडपाणी वाहिनी बदलण्याची नितांत गरज आहे.
आरोग्य आणि शिक्षणाची कमतरता: या भागात एकही मोठे उद्यान किंवा मुलांसाठी खेळाचे मैदान नाही. तसेच अभ्यासिकेसारख्या शैक्षणिक सुविधांचाही अभाव आहे.
४. विकासाचा आढावा: प्रभाग १२
मार्गी लागलेली कामे :-
- तळवडे गायरान जागेत बायोडायव्हर्सिटी पार्कच्या कामाला सुरुवात.
- ज्योतिबानगर आणि सोनवणे वस्तीतील रस्ते रुंदीकरण व डांबरीकरण.
- काही भागांत भूमिगत विद्युत केबल टाकण्याचे काम पूर्ण.
रखडलेली कामे:-
- तळवडे आणि रुपिनगर भागातील अंतर्गत रस्त्यांचे प्रलंबित डिकीकरण.
- एमआयडीसी परिसरातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था.
- परिसरात स्वतंत्र पोलीस चौकी आणि सुसज्ज रुग्णालय.
५. विश्लेषण: प्रभाग १२
(बळ):- औद्योगिक परिसरामुळे येथे रोजगाराच्या संधी आणि मोठी लोकसंख्या आहे.
(उणिवा):- रेड झोनमुळे विकासकामांवर येणारी मर्यादा ही सर्वात मोठी कमकुवत बाजू आहे.
(संधी):- रेड झोन हद्द कमी करण्यासाठी पाठपुरावा केल्यास कोणत्याही नेत्याला ऐतिहासिक कौल मिळू शकतो.
(धोका):- पाणी टंचाई आणि ड्रेनेजच्या समस्यांमुळे पसरणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी प्रशासनाविरुद्ध रोष निर्माण करत आहेत.
पॉलिटिकल वझीरच्या सूचना:
प्रभाग १२ मध्ये विजय मिळवण्यासाठी केवळ रस्ते बांधणे पुरेसे नाही. जो उमेदवार ‘रेड झोन’मधून सुटका मिळवण्यासाठी दिल्ली आणि मुंबई दरबारी वजन वापरेल आणि ‘अतिक्रमणमुक्त रुपिनगर’ चे मॉडेल मांडेल, त्यालाच तळवडेकर पसंती देतील



