विदर्भातल्या पहिल्या टप्यातल्या पाच मतदारसंघात कोण मारणार बाजी..?
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका संपल्या आहेत, ४ जुन ला निकाल लागणार आहे परंतू कोणत्या मतदारसघांत कोण बाजी मारेल याकडे सगळ्यांचे डोळे लागून आहेत. त्यामुळे एक एक मतदारसंघातली राजकीय परिस्थिती समजून घेऊन त्या मतदारसंघात कोणाच्या विजयाचे वारे वाहत आहेत याचा अंदाज घेवूयात.
महाराष्ट्रातला विदर्भ लोकसभा निवडणुकीच्या काळात खुप चेर्चाचा विषय बनला होता,महावीकास आघाडी कडून लवकर उमेदवार जाहीर केले गेले नाही त्यामुळे महावीकास आघाडी कोणती राजकीय खेळी खेळेल या कडे सामान्य जनतेचे लक्ष होते.
महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदात पार पडणार आहे असे निवडणुक आयोगाने जाहिर केले होते. आणि पहिल्याच टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात निवडणुका पार पडल्या यात नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली चिमूर या पाच मतदार संघाचा समावेश होता.
पहील्या टप्यातले मतदान जरी शांततेत पार पडले असले तरी अर्ज भरण्या पासूनच या मतदारसंघाचे वातावरण तापले होते महायुती कडून उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली होती. आणि महाविकास आघाडीचे सुद्धा वरिष्ठ नेते या मतदारसंघात उमेदवारीचा अर्ज भरताना हजेरी लावत होते.
रामटेक मतदारसंघात रश्मी बर्वे यांनी काँग्रेस कडून उमेदवारी अर्ज भरला होता.परंतू त्यांचा जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचा अर्ज अमान्य झाला (SC साठी राखीव असल्यमुळे) आणि त्याच्या जागी त्यांचे पती श्याम बर्वे काँग्रेस कडून मैदानात उतरले.
आणि त्यांच्या विरोधात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या कडून राजू परवे यांना उमेदवारी दिली होती. एकनाथ शिंदे यांच्या गटातले राजू परवे हे लोकसभेसाठी मैदानात उतरलेले पहिल्या टप्प्यातले एकटेच उमेदवार असल्यामुळे एकनाथ शिंदे या मतदारसंघात प्रचारासाठी फिरत होते. परंतू या मतदार संघात शिवसेनेचं जास्त प्रभाव दिसून येत नाही मागील खासदर जरी शिवसेनेचा असला तरी ते भाजपच्या मदतीने निवडूण आले होते हे नाकारता येत नाही.
या वेळेस या मतदारसंघातून भाजप आपला उमेदवार उभा करण्याच्या तयारीत होता परंतू एकनाथ शिंदे यांच्या मागणी वरून राजू परवे यांना उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघात शिवसेनाची ताकद जास्त नसली तरी या मतदारसंघात नितीन गडकरी, देविंद्र फडणवीस यांचा चांगली दबदबा आहे त्यांची मदत राजू परवे यांना होईल असा अंदाज आहे काँग्रेस समोर अपक्ष उमेदवार किशोर गजभिये आणि वंचित उमेदवार शंकर चहांदे यांचे आव्हान आहे त्या मुळे रामटेक मध्ये महायुतीचा उमेदवार येईल असा अंदाज दर्शवला जातोय.
नागपूर हा विदर्भातील प्रमुख मतदासंघांपैकी एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. संघाचे मुख्यालय आणि दीक्षाभूमी असे दोन वैचारिक ठिकाण या मतदारसंघात आहेत.२०१४ पर्यंत इथे काँग्रेस सत्तेत होते म्हणून या मतदारसंघाला काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जायचे. परंतू २०१४ मध्ये नितीन गडकरी यांनी बाजी मारली आणि नागपूर भाजप कडे गेले २०१९ मध्ये नितीन गडकरी यांनी नाना पटोले यांचा २ लाख मतानी पराभव केला होता अत्ता करत एकदा ते नागपूर मतदार संघातून लोकसभा निवडणुकीच्या मैदनात उतरले आहेत.
त्यांच्या विरोधात काँग्रेसनी विकास ठाकरे यांना मैदानात उतरवले आहे. नागपूर मतदार संघात आंबेडकर वैचारिक मतदारांची संख्या बरीच आहे आणि मराठा कुनभी मतदार सुद्धा भाजप वर नाराज आहेत याचा फायदा विकास ठाकरे यांना होणार आहे. परतू नागपूर मध्ये नितीन गडकरी यांची राजकीय ताकद खुप जास्त आहे त्यामुळे या मतदारसंघात भाजपच बाजी मारेल असा अंदाज आहे.
भंडारा गोंदिया हा मतदार संघ एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे या मतदारसंघातुन दोन मोठे नेते येतात त्यामूळे ही निवडणुक त्यांच्या प्रतिमेची आणि असतित्वाची आहे. या मतदारसंघात भाजप कडून सुनील मेंढे आणि काँग्रेस कडून प्रशांत पडोळ यांना जरी उमेदवारीचा मिळाली असली तरी यांच्या मागे काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादी(अजित पवार गटा) चे प्रफुल्ल पटेल या दोन बड्या नेत्याचा पाठींबा आहे भंडारा मध्ये पटोले यांचा चांगला दबदबा आहे तर गोंदिया मध्ये प्रफुल्ल पटेल यांचा दबदबा आहे. त्यामूळे इथे कोण येईल याचा अंदाज येत नाहीय.
चंद्रपूर ह्या मतदारसंघातील निवडणूक या वेळेस जरा गुंतागुंतीची झाली भाजपनी या मतदारसंघातुन सुधीर मुनगंटीवार यांना त्यांची इच्छा नसताना उमेदवारी देण्यात आली होती त्यामुळे इतर नेत्यात आणि कार्यकारत्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाले हीते.
त्यांच्या विरोधात काँग्रेस च्या प्रतिभा धानोरकर आहेत त्यानं सुद्धा उमेदवारी मिळवताना बराच संघर्ष करावा लागला होता. त्या बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत बाळू धानोरकर यांच्या मुत्यू मुळे प्रतिभा धानोरकर यांच्या बाबतीत मतदारांची सहानुभूती असल्याचे बोलले जात आहे.
आणि मागील निवणुकीत जातींच्या आधारे बाळू धानोरकर निवडूण आले होते या वेळेस सुद्धा जातीचा प्रतिभा धानोरकर यांना पाठिंबा भेटलं असे बोलले जात आहे.
त्यांच्या विरोधात मुनगंटीवार विकासाच्या अधरवर मतदान मागत होते आणि आदिवासी मतदान मिळवण्या साठी त्यांना सहानुभूती पूर्वक आपल्या कडे वळवण्याचा प्रयत्न भाजप कडून केला गेला. त्यामुळे त्यांना त्याचा किती फायदा होईल या वर चंद्रपूरचं राजकरण ठरलं.
गाचिरोली चिमूर पहील्या टप्प्यात सर्वात जास्त मतदान या मतदारसंघात झाले आहे.या अधिक मतदानाचा फायदा कोणाला होईल या वर या मतदारसंघाचें राजकरण ठरणार आहे.
हा मतदारसंघ महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदारसंघ म्हणुन ओळखला जातो.या मतदासंघातुन भाजप कडून अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते सलग दोन वेळा या मतदारसंघातुन निवडूण आले आहेत, परंतु या वेळेस मतदार त्यांच्या वर नाराज आहेत असे चित्र दिसत आहे.
१० वर्ष त्यांच्या कडे सत्ता असून सुद्धा त्यांनी काही काम केल नाही असे लोकांचे मत आहे. मागील दोन निवडणूकीत ते मोदी फॅक्टर मुळे निवडूण आले परंतू या वेळेस मोदी फॅक्टर काम करेल का हा प्रश्न आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेस कडून नामदेव किरसान यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांनी या वेळेस कट्टर टक्कर दिली आहे. त्यांनी पदयात्रा काढून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. मतदारांशी ते चागल्या प्रकारे जुडलेले नेते आहेत. त्यामूळे त्यांना त्यांचा फायदा होईल आणि या वेळेस गाचिरोली चिमूर मध्ये सत्ता पलट होईल असा अंदाज आहे.
तुम्हाला काय वाटते,पाहिल्या टप्यात या पाच मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल तुमचे मत कळवा.